breaking-newsपिंपरी / चिंचवड

बाल दिनानिमित्त सायन्स पार्कच्या वतीने विविध कार्यक्रम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने गुरूवार (दि. 14 नोव्हेंबर) हा दिवस स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या दिवशी बाल चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोब्जमार्शल यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 16 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान हा महोत्सव सुरू घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता चित्रकला स्पर्धा (5 ते 7 लहान गट व 8 ते 11 मोठा गट) घेण्यात येणार आहेत.

दुपारी बारा वाजता जादूमधील विज्ञान सादर केले जाणार आहे. दुपारी 1 वाजता खुली विज्ञान प्रश्न मंजुषा (5 ते 7 लहान गट आणि 8 ते 11 मोठा गट) घेण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता गमतीशीर विज्ञान प्रयोगशाळा घेण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी वरील सर्व कार्यक्रम मोफत उपलब्ध राहणार आहे. त्याचा लाभ घ्यावे आसे आवाहन सायन्स पार्कच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button