breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

काल मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा कार्यभार संपुष्टात; आज दालनसह इतर साहित्य परत करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्य आणि मंत्र्यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याचं परिपत्रक जारी झालं आहे. सर्व विभागातील मंत्र्यांचे दालन, कार्यालयीन नोंद वह्या, फर्निचर इत्यादींची आवराआवर करण्याच्या आणि ताबा सुपूर्द करण्याचा आदेश यात देण्यात आला आहे. तसंच प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचारी, अधिकारी वर्गाला मूळ विभागात रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • या गोष्टी परत करण्याचे आदेश
  • दालन/कार्यालय
  • जडवस्तू, लेखनसामग्री, टपाल तिकीटे, रजिस्टर, हजेरीपट
  • मुख्यालय आरक्षण पुस्तिका
  • मंत्र्यांचे वेतन आणि प्रवास खर्चाच्या प्रती
  • मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल/ प्रमाणपत्र
  • मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे
  • दालन/कार्यालयातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button