breaking-newsराष्ट्रिय

काश्मीर: वाहन दरीत कोसळून १६ जण ठार

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्याच्या मरमात गावापाशी मंगळवारी प्रवासी वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात १६ प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये पाच महिला व तीन बालकांचा समावेश आहे.

अपघातग्रस्त वाहनातील एका जखमी प्रवाशावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात बारा जण घटनास्थळीच मरण पावले, तर जखमींपैकी चार जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एका धोकादायक वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटून प्रवासी वाहन रस्त्यावरून घसरून ७०० मीटर खोल दरीत कोसळले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button