breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बाजीरावांच्या ‘मस्तानी’ स्मृती स्थळाला अकरा वंशजांची भेट

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील मस्तानीच्या स्मृस्तीस्थळाला मस्तानीच्या अकरा वंशजांनी नुकतीच भेट दिली. मध्यप्रदेश येथे राहणारे मस्तानीचे वंशजांची ही सातवी आणि आठवी पिढी आहे. मस्तानी वर आधारीत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते.

यावेळी त्यांनी शनिवार वाड्याला भेट दिली, त्यानंतर मस्तानीच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मस्तानी यांचे वंशज नवाब इरफान अली बहादूर, तमकीन अली जोश बहादूर, झुबेर अली जोश बहादूर, दरुकीन अली बहादूर, उस्मान अली बहादूर, सना अली बहादूर, फिरोजा सुल्तान, उजरे अली बहादूर, अल्मास बहादूर सोबत होते.

बहादूर कुटुंबातल्या सदस्यांनी एवढ्या संख्येने एकत्र येत पहिल्यांदाच शनिवारवाडा व पाबळ येथील समाधीला भेट दिली. पुण्यात आल्यावर भरपूर प्रेम मिळाले, अशी भावना या वंशजांनी व्यक्त केली. शनिवारवाड्यासह केळकर संग्रहालय, रास्ते वाडा या ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button