breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी : राज्य पोलीस सेवेतील ५८ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यातील १५ अधिकारी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले देविदास काशिनाथ घेवारे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहायक आयुक्त पदावर बदली झाली आहे.

पुणे ग्रामीणच्या शिरूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक यशवंत गवारी यांची सोलापूर शहर येथे सहायक आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी ठाणे ग्रामीण मधील गणेशपुरी येथे उप अधीक्षक असलेले प्रशांत बाबासाहेब ढोले यांची बदली झाली आहे.

हेही वाचा – ‘१० फेब्रुवारीला बैठक आणि उपोषण सुरु’; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले सुदर्शन साईदास राठोड यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बारामती विभागाचे पोलीस उप अधीक्षक पदी पदस्थापना करण्यात आली आहे. तर बारामतीचे पोलीस उप अधीक्षक गणेश इंगळे यांची नांदेड ग्रामीण पोलीस दलात पोलीस उप अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या पद्मावती शिवाजी कदम यांची अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पदस्थापना करण्यात आली आहे. तसेच सातारा ग्रामीणचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र धैर्यशील शेळके यांची देखील अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button