breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कचरा समस्येबाबत जगतापांना साक्षात्कार’; संकलन शुल्क रद्द करण्याची केली मागणी

  • भाजपच्या आमदाराने भाजपच्याच महापौरांकडे केली मागणी
  • शहर नियंत्रणात असताना मागणी कशासाठी, सुज्ञ नागरिकांचा प्रश्न

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत नागरिकांना आकारण्यात येणारे दरमहा ६० रुपये शुल्क रद्द करण्यात यावे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर माई ढोरे यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर माई ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांकडून दरमहा ६० रुपये आकारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर वार्षिक ७२० रुपयांचा बोजा पडत आहे. मध्यमवर्गीय आणि सधन कुटुंबांना ही रक्कम तुटपुंजी वाटत असली तरी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना ही रक्कम देणे परवडणारे नाही. अशा नागरिकांकडून कचरा घेण्यासाठी शुल्क घेणे योग्य ठरणार नाही.

कचरा समस्या असताना शूल्क आकारणी अयोग्य

घरोघरचा कचरा गोळा करण्याचे काम प्रभावीपणे केले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. शहराच्या काही भागात अजूनही कचरा समस्या आहे. ती सोडविण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाकडून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात असल्या तरी एकीकडे कचरा समस्या आणि दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी दरमहा ६० रुपये शुल्क आकारणे संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे अशा प्रकारे शुल्क आकारणी करणे रद्द करावे. त्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात यावा. तसेच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात यावा, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button