breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

मोशीत क्रिकेट स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल!

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे लेखाशिर्षामध्ये बदल; आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेची आयुक्तांकडून अंमलबजावणी

पिंपरी। प्रतिनिधी

मोशी येथील क्रिकेट स्टेडिअमसह आता आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखाशीर्षात बदल केला आहे. भाजपा आमदार तथा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी अंमलबजावणी केली असून, महासभेमध्ये संबंधित प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘औद्योगिक नगरी’, ‘कामगारनगरी ’ अशी आहे. भविष्यकाळात ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून शहराचा लौकीक व्हावा. या हेतूने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अभियानांतर्गत स्केटिंग ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, भोसरी मल्टीपर्पज स्पोर्ट्स गॅलरी, मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीकेंद्र, बास्केटबॉल मैदान, टेनिस कोर्ट आणि हॉलीबॉल, जलतरण तलाव, प्ले ग्राउंड आदी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. तसेच, २०१९ पासून मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारण्यात येत आहे. प्रशासनाने स्टेडिअमच्या कामासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च आणि लेखाशिर्षाला मंजुरी दिली आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी, शहरामध्ये ‘चऱ्होली-चिखली-मोशी हा रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. शहरात विकासाच्या सर्वाधिक संधी असलेला हा परिसर नावारुपाला येत आहे. त्या अनुशंगाने या परिसरात निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमला वर्षभरातील आठ ते दहा महिने प्रेक्षकांची गर्दी होण्यासाठी हा प्रकल्प केवळ स्टेडिअम म्हणून नव्हे, तर सर्वप्रकारच्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडा संकुल म्हणून विकसित करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली होती.

तसेच, यासंदर्भात लेखाशिर्षामध्ये बदल करावा व बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलाच्या धर्तीवर ‘‘आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूल’’ विकसित करण्यासाठी व्यापक लेखाशिर्ष करावे. ज्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली होती. आता नगरसचिव विभागाच्या मान्यतेने बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती मिळणार आहे.

मोशी आरक्षण क्रमांक १/२०४ येथे क्रिकेट स्टेडियमसह बहुउद्देशीय क्रीडा संकुल निर्मिती झाल्यास या मैदानावर प्रेक्षकांची वर्षातील किमान सात ते आठ महिने गर्दी राहणार आहे. प्रेक्षकसंख्या वाढल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, महापालिका प्रशासनाच्या महसुलातही भर पडणार आहे. त्यामुळे लेखाशीर्ष व्यापक करून क्रिकेट स्टेडियम आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुल विकसित करावे, अशी सूचना केली होती त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

महेश लांडगे,
आमदार भोसरी विधानसभा. निवडणूक प्रमुख, शिरूर लोकसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button