breaking-newsराष्ट्रिय

उत्तराखंडमध्ये भूस्खलनाने हृषिकेश-गंगोत्री महामार्ग बंद

डेहराडून : उत्तराखंडमध्ये सोमवारी सकाळी पिथोरीगढमधल्या मुनस्यारीमध्ये अचानक ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात नाल्यात वेगाने पाणी जात असल्याचे पाहायला मिळत. ढगफुटी झाल्याने सेराघाट इथल्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टला नुकसान झाले आहे.

वेगाने येणा-या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रोजेक्टच्या डॅमलाही तडे गेले आहेत. तर दुसरीकडे भूस्खलनामुळे हृषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. माहितीनुसार, रविवारी रात्री हृषिकेशमधल्या कुंजापुरी देवी मंदिराजवळ भूस्खलन झाले. प्रशासनाच्या वतीने बचावकार्य राबवले जात असून, रस्त्यावरून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

उत्तराखंडला येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन सचिव अमित नेगीने भूस्खलन प्रभावित क्षेत्रात बचावकार्यसाठी लागणारी सर्व उपकरणे तैनात केली आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी निपटण्यासाठी आयटीबीपी, एनडीआरएफ, आरोग्य विभाग, पोलीस, लष्कर आणि हवामान खाते एकमेकांच्या संपर्कात आहेत. परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या कॅमे-यांचाही वापर करण्यात येतोय. मान्सूनदरम्यान उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button