breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्यांना दणका; 55 जणांचे एक महिन्याचे वेतन रोखले

  • आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा आदेश, वेतन काढल्यास संबंधित विभागावर कारवाई

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब ते गट ड मधील अधिकारी व कर्मचा-यांच्या माहे मे 2019 मध्ये बदली करण्यात आल्या. मात्र,  55 अधिकारी व कर्मचारी बदली दिलेल्या विभागात रुजू  न झाल्याने बहुतांशी विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. कर्मचा-यानी आदेशाचे उल्लंघन करीत गैरवर्तन केल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणा-या 55 जणांचे माहे जून महिन्याचे वेतन काढण्यात येवू नये, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय विभागाने माहे मे 2019 मध्ये गट ब ते गट ड मधील शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक सेवा व प्रशासकीय कामकाज सोयीच्या दृष्टीने ह्या बदली करण्यात आल्या. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्व विभागानी पर्यायी कर्मचारी हजर होण्याची वाट न पाहता बदली झालेल्या कर्मचा-यांना तात्काळ कार्यमुक्त करुन प्रशासन विभागास कळवावे लागते.

अनेक कर्मचारी हे विभागातून कार्यमुक्त होवून बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निर्दशनास आले. तसेच बदली झालेला कर्मचारी रुजू होण्यास आल्यास विनाविलंब रुजू करुन घ्यावे, त्या कर्मचा-याला रुजू करु न घेतल्यामुळे सक्तीचा प्रतिक्षा काळ ठरवून काम न देता वेतन व भक्ते देण्याचा प्रसंग उद्भवल्यास संबंधित विभाग प्रमुख जबाबदार धरण्यात येणार आहे.

महापालिकेतील तब्बल 55 जण बदली झालेल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. अनेक जण वैद्यकीय रजा टाकून कामाला दांडी मारु लागले आहेत. तसेच राजकीय दवाब आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात येवू लागला आहे. त्या अधिकारी व कर्मचा-यांचे माहे जून 2019 पासूनचे वेतन कोणत्याही परस्थितीत बदलीपुर्वीच्या विभागाकडून काढण्यात येवू नये. सदरचे वेतन संबंधित अधिकारी व कर्मचारी बदलीच्या विभागात हजर झाल्यानंतर त्या विभागातून काढावे, तसा अहवाल प्रशासन विभागाने सादर करावा, माहे जून 2019 पासूनचे वेतन बदलीपुर्वी बदलीपुर्व विभागातून अदा केल्यास त्या विभागाचे विभाग प्रमुख जबाबदार राहणार आहेत.

दरम्यान, बदली रद्द करण्यास राजकीय दबावाची कृती केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील 3 (3) व 23 चे उल्लंघन करणारी असल्याने गैरवर्तणूक समजून त्या कर्मचा-याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, तसेच त्या कर्मचा-यांचे कोणत्याही रजेचे अर्ज स्विकारु नयेत. असेही आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button