breaking-newsपिंपरी / चिंचवड

डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठात योग दिन साजरा   

पिंपरी – डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, पिंपरी पुणे  येथे  केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार  यांच्या निर्देशानुसार  स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने २१ जून जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला सकाळच्या योग  सत्राचे उद्घाटन आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रागंणात  महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले.
करा योग  रहा निरोग हा आरोग्य मंत्र त्यांनी युवकांना दिला आरोग्यासाठी नियमित योग करावा व योगाचे महत्त्व सांगून राहुल जाधव यांनी योग संदेश दिला या कार्यक्रमाला विद्यपीठाचे कुलगुरु डॉ.  एन. जे पवार, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेद्र शर्मा, भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  तुषार पालेकर, परिचारिका महाविद्यालयांच्या प्राचार्य रुपाली साळवी, आयुर्वेद उप प्राचार्य डॉ प्रशांत खाडे, योग प्रभारी डॉ.  संतोष कांबळे, सल्लागार डॉ.  बी.पी पांडे उपस्थित होते.
या योग सत्रात विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार ध्यान, ध्यानधारणा  योगाभ्यास करण्यात आला.   या कार्यक्रमात  डॉ.  डी.  वाय.  पाटील विद्यापीठ व विद्याप्रतिष्ठान सोसायटी अंतर्गत येणारे विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी योगाभ्यास सत्रात सहभागी होते.  एकूण ४१० सह्भागार्थीनी लाभ घेतला.
योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये निबंध स्पर्धा, योग दिंडी, योगाभ्यास वर्ग, भिंती चित्र  स्पर्धा, रांगोळी, व्याख्यानमाला  इ चे आयोजन आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेतून तीन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.
“आपले आरोग्य सुदृढ निरोगी राहावे आणि सर्वांचा कल योग व सूर्यनमस्काराकडे वाढावा. योग विषयी जनजागृती व्हावी तसेच प्रचार व प्रसार व्हावा” या प्रमुख उद्देशाने या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्मृतिका तावरे व आभार प्रदर्शन डॉ प्रशांत खाडे केले. संपूर्ण योगसप्ताह व योग दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन योग प्रभारी डॉ संतोष कांबळे स्वस्थवृत्त विभाग यांनी केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button