breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिळकतीचे खोटे व बनावट नकाशे तयार करणा-याविरोधात गुन्हा दाखल

  • सांगवी पोलिसांकडून एकाला अटक,  पिंपरी नगर भूमापन कार्यालयातून घेतले ताब्यात

पिंपरी – पिंपळे निलख येथील एका मिळकतीचे खोटे व बनावट नकाशे तयार करुन त्यावर खोट्या, चुकीच्या चतुःसीमा दाखवून त्या ख-या आहेत. असे भासवून सदरचे नकाशे हे आरोपीने अप्पर तहसीलदार दाखल केली. या प्रकरणात सदरील आरोपींनी शासनाची फसवणुक केल्याने सांगवी पोलिस स्टेशनला एका विरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

अरविंद नारायण साठे ( रा. वाकवस्ती, पिंपळे निलख) यांच्या विरोधात सांगवी पोलिस स्टेशनला भा.द.वि. कलम 420, 466, 468 आणि 471 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपींने फिर्यादी हेमंत कांतीलाल साठे यांच्या आई – वडीलांचे नावे असलेल्या सिटी सर्व्हे नंबर 723,724,725,726,727,728, 731 आणि 732 असे सर्व्हे नंबर 64 मधील मिळकतीचे खोटे, बनावट नकाशे तयार करुन त्यावर खोट्या व चुकीच्या चतुःसीमा दाखवून त्या ख-या आहेत. असे भासवून सदरचे नकाशे हे आरोपीने अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड कार्यालयात मामलेदार कोर्ट अॅक्ट 1966 मधील कलम 5(2) अन्वये दावा दाखल करताना सदरची कागदपत्रे त्यामध्ये वापरली आहेत. फिर्यादीचे हक्कास बाधा आणून फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याने आरोपी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ हे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button