breaking-newsपिंपरी / चिंचवड

विधान परिषद दंगल : राष्ट्रवादीकडून तरुणांना मोठी अपेक्षा, मयूर कलाटे यांनी ठोकला शड्डू?

गेल्या ३५ वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध ठरणार फायदेशीर

सोशल मीडियावर कलाटे समर्थक कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

विधानपरिषदेवर पिंपरी-चिंचवडला संधी‌ मिळावी अशी आशा राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच लागली आहे. मात्र, आजपर्यंतचा राजकीय आलेख पाहिला तर शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातील तरुण तडफदार कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. विधानपरिषदेवर देखील तरुणांनाच संधी मिळाणार अशी खात्री असल्याने वाकड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी या जागेसाठी शड्डू ठोकला आहे. यासंबंधीत पोस्ट अपलोड करुन त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सलग १५ वर्षे सत्ता असताना पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहरातील अनेकांना मानाची पदे दिली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेते अशा पदांवर काम करण्याची अनेकांना संधी मिळाली. पक्षाच्या कार्यकारीणीमध्ये इच्छुकांना शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, युवक अध्यक्ष, विद्यार्थी संघटनेवर अध्यक्ष, महिला अध्यक्षा अशी पदे भूषविण्याची संधी अनेकांना प्राप्त झाली. दरम्यान, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अनेकांनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपात प्रवेश केला. उरले सुरले पदाधिकारी पक्षात तग धरुन राहिले. दादांनी सुध्दा त्यांना जीवापाड जपले. आता यातील काहींनी विधानपरिषदेची मागणी केली आहे. यातील कोणाला संधी मिळणार हे येणारा काळच ठरवेल.

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्याबाबतचा निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातात आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर तरुणांना संधी देण्याची गरज आहे, असे पवार साहेब वारंवार म्हणतात. त्याच त्या पदाधिकाऱ्यांना पदे देऊन पुढे करणे हे साहेबांना मान्य असल्याचे यातून दिसत नाही. म्हणूनच, तरुणांना संधी मिळत असल्याने येणा-या विधानपरिषदेच्या जागेसाठी पिंपरीतील तरुण नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना पक्षाकडून अपेक्षा लागली आहे. वाकड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक व माजी युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांनी या जागेसाठी शड्डू ठोकला आहे. त्यांनी पवार साहेबांशी संवाद साधल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्याशीही संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. पक्षनिष्ठा आणि कौटुंबिक जिव्हाळा असल्याने कलाटे यांना पक्षाकडून विधानपरिषदेवर संधी मिळणे अनिवार्य असल्याच्या पोस्ट त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

संत्तातरानंतरही कलाटे कुटुंबियांची पक्षाला साथ

कलाटे आणि पवार कुटुंबियांचे गेल्या ३५ वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सत्ता असताना नव्हे तर सत्तांतराच्या काळात देखील कलाटे कुटुंबिय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. पक्षात अनेक आले आणि अनेकजण बाहेर पडले. परंतू, कलाटे कुटुंबातील सदस्यांनी निःसंकोचपणे पवार साहेब आणि राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. भाजपची मोठी offer असताना देखील कलाटे यांनी ती धुडकावून लावली. निस्वार्थपणे त्यांनी पक्षाचे काम केले. त्यांनी केलेल्या कामाची पक्ष नक्कीच दखल घेणार असल्याचा विश्वास त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button