breaking-newsपिंपरी / चिंचवड

बचतगटांच्या महिलांना मिळाला स्वयंरोजगार, जिजाई प्रतिष्ठानचा पुढाकार

पिपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिमा सावळे यांनी राखी बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. राखी उत्पादनासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य महिलांना मोफत देण्यात आले. यामुळे अनेक महिला बचतटांच्या महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. महिलांनी बनिवेल्या आधुनिक व आकर्षक ऱाख्यांचा हा खजाना सर्वांसाठी खुला कऱण्यात आला आहे.

केवळ सेवाभावी कार्यातून सुरू केलेल्या या उपक्रमाला यंदाही भरभरून प्रतिसाद लाभला आहे. बाजारभावापेक्षा कितीतरी वाजवी दरात या राख्या उपलब्ध आहेत. महिला बचतगटातील अत्यंत सर्वसामान्य महिलांना एक प्रोत्साहन म्हणून तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे कऱण्याच्या प्रयत्नाला आपला हातभार लगू दद्या, असे आवाहन सिमा सावळे यांनी केले आहे. जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सिमा सावळे यांनी महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठीच प्रतिष्ठानाच्या वतीने महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर घेतले. रक्षाबंधन सणाला बाजारात राख्यांची मोठी मागणी असते. त्याच अनुशंगाने सिमा सावळे यांनी महिलांना राखी निर्मिती प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला व त्याला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विविध रंगाची फुले, गणपती व रंगीबेरंगी मण्यांचे व खड्यांचे नक्षिकाम असलेल्या या राख्या लक्ष वेधतात. या राख्यांना सर्वांच्या पसंतीला पडत आहेत, त्याना मागणीही वाढली आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिमा सावळे म्हणाल्या कि, “महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी विविध उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात. गेल्या वर्षी राखी बनविण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला होता. सर्वसामान्य महिलांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले. बचत गटाच्या महिलांनी या उपक्रमात मोठा सहभाग घेतला होता. प्रशिक्षण घेतलेल्या बचत गटातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जिजाई प्रतिष्ठानाच्या वतीने राखी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल देखील मोफत देण्यात आला. गतवर्षी महिलांनी तयार केलेल्या राख्या त्यांनी स्वत:च विक्री केल्या व त्यातून महिलांना भरीव उत्पन्न मिळाले. यंदा कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे. आर्थिक संकटामुळे सर्वसामान्य अगदी हवालदिल झाले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभुमीवर जिजाई प्रतिष्ठानाच्या वतीने राखी बनविण्याचे प्रशिक्षण देऊन राखी बनविण्यासाठी आवश्यक असणारा सर्व कच्चा माल महिलांना मोफत देण्यात येत आहे.  या राख्यांना मार्केटही मिळत आहे. महिलांना रोजगार मिळाला असल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशाच पद्धतीने महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी आम्ही कायम कटिबध्द आहोत ”, असे सिमा सावळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button