breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात नवी नियमावली आणि,नवे 87 प्रतिबंध क्षेत्र जाहीर

पुण्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. पुणे शहरात 24 जुलै लॉकडाऊन नाही आहे. 13 जुलैच्या अगोदर शासनाने आणि महानगरपालिकेने जाहीर केलेली नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय विशेष अधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.

यानुसार, प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर नियम आणि अटीनुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी मार्केटला खरेदीसाठी गर्दी होते. त्याचबरोबर लग्नसमारंभात गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठला असला तरी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध घालण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी नियमावली प्रसिद्ध केली आहे.


या नियमावलीनुसार, नागरिकांना व्यवसायिकांना परवानगी देण्यात आली. लग्न सोहळा आणि अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याचे बंधन अनिवार्य असणार आहे. नव्या नियमावलीनुसार, ८७ प्रतिबंध क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत.

  • प्रतिबंधित क्षेत्राबाहेर व्यायामासाठी मुभा असणार आहे.
  • सकाळी ५ ते ७ व्यायाम करता येणार आहे.
  • लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती असणे गरजेचे आहे.
  • मैदानांवर गर्दी करता येणार नाही.
  • व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत.
  • दुकाने पी-१ पी-२ प्रमाणे सुरु राहतील.
  • खाजगी कार्यालये १५ टक्के किंवा १५ जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करु शकतील.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार.
  • हॉकर्सला व्यवसाय सुरु करता येणार आहेत.
  • पार्सल, कुरियर सुरु होणार.
  • घरमालकाची परवानगी असल्यास घरी काम करायला येणारे कामगार, जेष्ठ रुग्ण मदतनीस यांना परवानगी असणार. (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)
  • लग्न समारंभ, अंत्यसंस्कारासाठी २० जणांचीच मर्यादा असणार.
  • पुणे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर
  • सायकलिंग, जॉगिंग, धावणे हे मोकळ्या मैदानावर, पालिकेच्या मैदानावर, सोसायटी मैदान इथे अटींच्या अधीन राहून करता येणार आहे. मात्र, कोणतीही क्रिया क्रीडांगणाच्या बंदिस्त भागात केली जाणार नाही.
  • मॉल आणि व्यापारी संकुल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे रस्त्यावरील दुकाने सम-विषम यानुसार सूरु राहतील.
  • मंडई मधील सम क्रमांकांचे गाळे सम तारखेला आणि विषम क्रमाकांचे गाळे विषम तारखेला सुरु राहतील, हे सर्व सकाळी ९ ते संध्या ७ या वेळेत नियमानुसार सुरु राहतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button