breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

रामगोपाल वर्मांच्या चित्रपटाविरोधात ‘दिशा’च्या कुटुंबीयांची याचिका

हैदराबादमध्ये दिशा बलात्कार आणि जळीतकांडातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊन्टरमध्ये खात्मा केला होता. या घटनेवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे एक चित्रपट बनविला आहे. दिशा एन्काऊन्टर असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यांनी यासाठी तेलंगाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

वर्मा यांनी यापूर्वी देशभर गाजलेल्या प्रणय खून प्रकरणावर चित्रपट बनविला होता. या चित्रपटावरही आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यावर न्यायालयानेच स्थगिती आणली होती. प्रणय आणि अमृता यांनी आंतरजातीय विवाह केला होता, जो अमृताच्या वडिलांना मान्य नसल्याने त्यांनी प्रणयची 2018 साली भाडोत्री गुंडांकरवी हत्या केली होती. कालांतराने अमृताच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.

दिशाच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी तेलंगाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी न्यायालयाकडे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचिकेमध्ये त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला प्रतिवादी केलं आहे. दिशा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत दिशावर चित्रपट बनविणे चुकीचे असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. 2019 साली देशभर गाजलेल्या दिशा प्रकरणावर वर्मा यांनी हा चित्रपट बनविला आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या दिशाचा शम्साबाद इथे खून करण्यात आला होता. तिथून 23 किलोमीटर दूर असलेल्या शादनगर भागात तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. दिशावर बलात्कार करून मग तिचा खून करण्यात आला होता असं तपासात उघड झालं होतं.

दिशावर बलात्कार करून तिचा खून करून जाळून मारल्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या तावडीतून सुटून पळण्याच्या प्रयत्नात या चारही आरोपींचे एन्काऊन्टर करण्यात आले होते. वर्मा यांनी या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रसिद्ध केले असून हा चित्रपट 26 नोव्हेंबरला प्रदर्शित करणार असल्याचेही घोषित केले आहे. न्यायमूर्ती पी नवीन राव यांच्यापुढे दिशाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेद्वारे दिशाच्या कुटुबीयांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका अशी विनंती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button