breaking-newsआंतरराष्टीय

फोटोशूटमुळे आलिया ट्रोल, नेटकऱ्यांना दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

फॅशन मासिकं अनेक वेळा आपल्या मासिकाच्या कव्हर फोटोसाठी अन्य दुसऱ्या मासिकाच्या मुखपृष्ठावरुन प्रेरणा घेत असतात. यातून ते आपल्या मासिकाचं मुख्यपृष्ठ तयार करतात. मात्र असं केल्यानंतर अनेक वेळा या मासिकांना ट्रोल व्हावं लागतं. तसंच काहीसं फिल्मफेअर या मासिकाच्या बाबतीत झालं आहे. फिल्मफेअर मासिकासाठी अभिनेत्री आलिया भट्टने एक फोटोशूट केलं होतं. मात्र फिल्मफेअरच्या मुखपृष्ठासाठी आलियाने दिलेली पोज कॉपी केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. त्यासोबतच तिला ट्रोलही करण्यात आलं आहे. आलियाने प्रसिद्ध गायिका दुआ लिपाची पोज कॉपी केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

सध्या इन्स्टाग्रामवर आलियाच्या फोटोची एक पोस्ट व्हायरल होत असून यात तिने दुआ लिपाची स्टाईल कॉपी केल्याचं म्हटलं आहे. या पोस्टनंतर अनेकांनी आलियावर टीका केली आहे. मात्र आलियाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्याचं दिसून येत आहे. आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या फोटोमागील कारण स्पष्ट केलं आहे.

“मी या मासिकासाठी ६ फेब्रुवारी रोजी फोटोशूट केलं होतं. तर दुसऱ्या मासिकावरचा फोटो २४ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यामुळे या स्टाईलची संकल्पना आम्ही कॉपी केलेली नाही”, असं आलियाने म्हटलं आहे.

दरम्यान, आलिया सध्या तिच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा ही तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया ‘तख्त’ या चित्रपटातही झळकणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button