breaking-newsक्रिडामनोरंजन

’83’ चित्रपटात आदिनाथ कोठारे साकारणार ‘या’ क्रिकेटपटूची भूमिका

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ या दिवशी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहे. याच क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून आतापर्यत या चित्रपटातील काही भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आता आणखी एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे. यापूर्वी चिराग पाटील या चित्रपटात झळकणार असून आता आदिनाथ कोठारेही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिनाथ या चित्रपटात झळकणार असल्याचं समजल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नावं. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं असून आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र ओळख आहे. त्यातच आता आदिनाथने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला आहे. आदिनाथ लवकरच ’83’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

Adinath Kothare

@adinathkothare

Super excited to begin this new journey with @kabirkhankk and team @83thefilm !

’83@83thefilm

.@adinathkothare gears up to step in the shoes of Dilip ‘colonel’ Vengsarkar. 🏏 #CastOf83 #Relive83#DilipVengsarkar @RanveerOfficial @kabirkhankk @RelianceEnt #MadhuMantena @vishinduri

View image on Twitter
20 people are talking about this

कबीर खान दिग्दर्शित ’83’ मध्ये आदिनाथ पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिनाथ लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे.

’83’ या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात मराठी अभिनेता चिराग पाटील त्याचे वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button