breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ दुर्घटनेतील मी नव्हे, मी सुखरुप आहे – आमदार संजय शिंदे

सोलापूर |महाईन्यूज|

नाशिकमध्ये गाडीला लागलेल्या आगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे यांचा (ता.13) ऑक्टोबर रोजी होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र अनेक वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सनी बातमी प्रसारित करताना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मी सुखरुप असून नजरचुकीने बातमीत माझा फोटो वापरल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरही पोस्ट केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाजवळ साकोरे मीग (निफाड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे यांच्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. संजय शिंदे हे नाशिकमधील द्राक्षांचे व्यापारी आहेत. द्राक्षांच्या बागेसाठी किटकनाशके  आणण्यासाठी ते पिंपळगावला निघाले होते. कडवा नदीवरील ओव्हरब्रिजजवळ असताना त्यांच्या गाडीत बिघाड झाला. शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीला आग लागली. कारमध्ये असलेल्या सॅनिटायझरमुळे आग आणखीच भडकली. शिवाय कारचा सेंट्रल लॉक लागल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

माञ काही ठिकाणी बातम्या दाखवताना करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो वापरला. आमदार संजयमामा शिंदे यांनी जरी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी त्यांना राष्ट्रवादीचा पाठींबा होता. शिवाय त्यांनी माढा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मृत्यू पावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय चंद्रभान शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावातील साम्य व राष्ट्रवादीशी असलेले संबंध यामुळे बातमी दाखवताना वाहिन्या व वेब पोर्टल यांच्याकडून झालेली गफलत याचा परिणाम करमाळय़ाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याविषयी बरे वाईट झाले की काय? असा गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये पसरल्याने आमदार संजयमामा शिंदे यांनी आपण आपल्या घरी निमगांव(टे) ता.माढा येथे सुखरूप असल्याचे सांगितले असून तशा आशयाची फेसबुक पोस्ट केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button