breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘फग्र्युसन’मध्ये सावरकरांना अभिवादन

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या फग्र्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीला भेट देऊन अनेकांनी मंगळवारी जयंतीनिमित्त सावरकर यांना अभिवादन केले.

सावरकर यांच्या १३७ व्या जयंतीनिमत्त महाविद्यालयाच्या वसतिगृहातील ही खोली दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. सावरकर प्रेमींनी मोठय़ा संख्येने या खोलीला भेट देऊन सावरकर यांना अभिवादन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संचालक अ‍ॅड. नितीन आपटे यांचे ‘सावरकरांचे कार्य कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. शाहीर हेमंत मावळे आणि सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, पं.  वसंतराव गाडगीळ , प्रा. स्वाती जोगळेकर आणि प्रा. आनंद काटिकर या वेळी उपस्थित होते.

सावरकर यांचे १९०२ ते १९०५ या कालावधीमध्ये फग्र्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्य होते. त्यांचा पलंग, खुर्ची, वकिली करीत असताना परिधान केलेले दोन गाऊन या खोलीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तसेच सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग चित्ररूप करण्यात आले आहेत. या साऱ्यांचे सावरकरप्रेमींनी दर्शन घेतले.

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button