breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रिकेटवर सट्टा घेणार्‍या दोघांना अटक

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडीमध्ये ही कारवाई केली. मनीष राजकुमार तलरेजा (४१, रा. विजयनगर काळेवाडी), नितीन तिरंतदास कुकरेजा (३५, रा.धर्मा अपार्टमेंट, पिंपरी ) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टी-२० सिरीज सिडनी थंडर विरूद्ध मेलबर्न स्टार्स या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा मारून आरोपींना अटक केली. त्याच्याकडून टीव्ही, सेट टॉप बॉक्स, नऊ मोबाईल, रायटिंग पॅड, लॅपटॉप असे १ लाख १५ हजार १०५ रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button