breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बारावीचा टक्का घसरला

पाच वर्षांतील नीचांकी निकाल; कोकणचे अव्वल स्थान कायम

राज्याचा बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला असून, गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात कमी निकाल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.५३ टक्क्यांनी घट झाली असून यंदा निकालात कोकण विभागाने सलग आठव्या वर्षी राज्यात अव्वल स्थान राखले, तर मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७.८५ टक्क्यांनी जास्त आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यंदा बारावीच्या नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिकांचा वापर करण्यात आला, तसेच काही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलण्यात आला. या पाश्र्वभूमीवर राज्यात पातळीवरील निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले.

यंदा विज्ञान शाखेचा ९२.६० टक्के, कला शाखेचा ७६.४५ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.२८ टक्के आणि व्यवसाय शिक्षण शाखेचा निकाल ७८.९३ टक्के लागला. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७.८५ टक्क्यांनी जास्त आहे. खासगीरीत्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६३.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आता पुढील काही दिवसांत सामायिकप्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल जाहीर झाल्यानंतर विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थी वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे वळतील. मात्र, कला आणि वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात किंवा नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस होण्याची शक्यता आहे.

निकालाची एकूण स्थिती

एकूण निकालात घट झाल्याने शाखानिहाय निकालावरही त्याचा परिणाम झाला. त्यात विज्ञान शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी, वाणिज्य शाखेचा निकाल २.४८ टक्क्यांनी, कला शाखेचा निकाल १.२२ टक्क्यांनी आणि व्यवसाय शाखेचा निकाल ३.२५ टक्क्यांनी घटला.

हे लक्षात ठेवा..

* गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – २९ मे ते ७ जून

* उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक

* छायाप्रत मिळाल्यानंतर पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज

* पुनर्परीक्षा – जुलै-ऑगस्टमध्ये

निकालातील घट.. २०१५ मध्ये असलेला ९१.०६ टक्के निकाल घटत यंदा हे प्रमाण ८५.८८ टक्क्यांवर आले. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२३ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८२.५१ टक्के लागला.

भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका किंवा काही विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखडय़ात बदल झाल्याने निकालात घट झाली असे वाटत नाही. दरवर्षी काही प्रमाणात वाढ किंवा घट होतच असते. यंदा घटलेला निकाल फार मोठा आहे असे नाही.

– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य मंडळ

दृष्टिक्षेपात निकाल

*परीक्षा दिलेले विद्यार्थी- १४,१२, ९३६

*उत्तीर्ण विद्यार्थी – १२ लाख २१ हजार १५९

*उत्तीर्ण मुलांचे प्रमाण – ८२.४० टक्के

*उत्तीर्ण मुलींचे प्रमाण – ९०.२५ टक्के

*९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – ४ हजार ४७०

*२२ विषयांचा निकाल १०० टक्के

*विशेष प्रावीण्य आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – १ लाख ०२ हजार ५५२

*प्रथमश्रेणी आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – ४ लाख ६४ हजार ४७

*द्वितीय श्रेणी आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – ६ लाख ३ हजार ११९

*उत्तीर्ण श्रेणी आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी – ५१ हजार ४४१

पुनर्परीक्षार्थीच्या निकालात घट

मुंबई: बारावीच्या परीक्षेची दोनदा संधी मिळालेल्या पुनर्परीक्षार्थीना यंदाची परीक्षा अधिकच जड गेल्याचे दिसत आहे. पुनर्परीक्षार्थीच्या निकालात जवळपास प्रत्येक विभागांत ८ ते १० टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी बारावीच्या घटलेल्या निकालाने पुनर्परीक्षार्थीची संख्या यंदा वाढली आहे. मात्र त्याच वेळी उत्तीर्णतेचे प्रमाण घटले आहे. या परीक्षेतील पुनर्परीक्षार्थीना पहिल्यांदा अनुत्तीर्ण झाल्यावर जुलैमधील परीक्षेची किमान एक संधी मिळाली होती. त्यानंतरही मार्चमधील परीक्षेला बसणाऱ्या अनुत्तीर्णाची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलीच आहे. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा साधारण अडीच टक्क्यांची घट झाली. मात्र पुनर्परीक्षार्थीच्या निकालात ८ ते १० टक्क्यांची घट झाली आहे. परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या  विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक विभागात वाढली आहे. यंदा राज्यात ६८ हजार ४५ पुनर्परीक्षार्थी होते. त्यातील अवघे १८ हजार ३१ विद्यार्थी (२६.५५ टक्के) उत्तीर्ण होऊ शकले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत ६६ हजार ६२९ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.अनुत्तीर्णाचा हा प्रश्न पुणे विभागात अधिक असून विभागाचा निकाल २१.१७ टक्के लागला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमही याला अपवाद ठरले नसून त्याच्या परीक्षेला बसलेले अवघे १६.०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालातील घट..

२०१५ मध्ये असलेला ९१.०६ टक्के निकाल घटत यंदा हे प्रमाण ८५.८८ टक्क्यांवर आले. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२३ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८२.५१ टक्के लागला.

भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका किंवा काही विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखडय़ात बदल झाल्याने निकालात घट झाली असे वाटत नाही. दरवर्षी काही प्रमाणात वाढ किंवा घट होतच असते. यंदा घटलेला निकाल फार मोठा आहे असे नाही.

– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य मंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button