breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

प्लॅस्टिक बंदीची पिंपरी चिंचवडमध्ये अंमलबजावणी सुरु ; शनिवारी तीन दुकानदारांना 15 हजाराचा दंड

पिंपरी – राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणीस आज (शनिवार) पासून सुरुवात झाली. नागरिकांकडे प्लॅस्टिक आढळल्यास दंड करण्यात येणार असून, त्याकरिता पिंपरी महापालिकेने आरोग्य निरीक्षक तसेच अन्य काही कर्मचारी अशा तब्बल १5० जणांची फौजच तयार केली आहे. दरम्यान, दुपारी अडीच पर्यत ई प्रभागात एका स्वीट मार्ट दुकानात तर ग प्रभागात न्यू भैरव सिलेक्शन व गणराज सिलेक्शन या दुकानात प्लास्टीक पिशव्या आढळून आल्या. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे 15 हजाराचा दंड करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिक किंवा उत्पादक अशा कोणालाही आता या कायद्याचा भंग करता येणार नाही. तपासणीत सापडले, की थेट दंड करण्यात येणार असून त्यातून सुटका होणार नाही. सरकारची परवानगी नाही अशा सर्व उद्योग-व्यवसायांवरही प्लॅस्टिक वापराचा आरोप ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

शहरी विभागात या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्याची दखल घेऊन महापालिकेने आरोग्य विभागातील १5० आरोग्य निरीक्षक व सहायक आरोग्य निरीक्षक तयार केले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक वापरावर लक्ष ठेवायचे आहे. पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी वापरली तर ५ हजार, दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंड, तिस-या वेळी मात्र थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानदार किंवा सामान्य नागरिक यांच्यासाठी समान दंड तसेच समान शिक्षा आहे.

दरम्यान, निमसरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुल, चित्रपट, नाट्य गृहे, औद्योगिक घटक, सभारंभाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, हॉटेल, ढाबे, दुकानदार, मॉल, किरकोळ विक्रेते, समुद्र किंवा नदी किनारे, रेल्वे, सर्व सार्वजनिक ठिकाणे यांच्यासह सर्वसामान्यांसाठी प्लास्टिक बंदी आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक किंवा थर्माकोलपासून तयार करण्यात येणारी ताटे, कप, प्लेट, काटे, वाट्या, चमचे, हॉटेलमधील अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ, द्रव पदार्थ साठविण्यासाठीच्या पिशव्या यावर बंदी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button