breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरमध्ये सुरक्षादलांबरोबर चकमकीत इसिसचे 3 दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – काश्‍मीरमध्ये सुरक्षादलांबरोबर चकमकीत इसिसचे 3 दहशतवादी ठार झाले आहेत. शस्त्रसंधी संपुष्टात आल्यानंतर काश्‍मीरमध्ये लष्कराचे ऑपरेशन ऑल आऊट सुरू झाले आहे. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकींना पुन्हा सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अनंतनागमधील श्रीगुफवाडा येथे सुरक्षादले आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत इसिसशी संबंधित तीन दहशतवादी मारले गेले आहेत. मारले गेलेले दहशतवादी जम्मू-काश्‍मीरमधील असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून सुरक्षादलांनी श्रीगुफवाड्यच्या संपूर्ण क्षेत्राला वेढा घातला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामामध्येही दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुलवामातील काचेपुरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यनंतर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यात लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यात झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले होते. त्यांच्याकडील एके-47 रायफलसह अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button