breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी, लोकांचा ओढा सरकारी नोकरीकडे; सरकारचा दावा

नवी दिल्ली । जगात सर्वाधिक कमी बेरोजगारी हिंदुस्थानमध्ये आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालाचा संदर्भ देऊन गंगवार यांनी राज्यसभेत सांगितले की, हिंदुस्थानपेक्षा चीन आणि आशिया पॅसिफिक भागात जास्त बेरोजगारी आहे.

अहवालातील आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचे प्रमाण 3.5 टक्के आहे. तर चीनमध्ये 4.7 टक्के तर आशिया पॅसिफिकमध्ये 4.2 टक्के बेरोजगारी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी जी रोजगारावरील आकडेवारी जाहीर झाली होती ती अयोग्य अस्ल्याचे गंगवार यांनी म्हटले. रोजगाराच्या बाबतीत हिंदुस्थानची अवस्था जरी इतर देशांपेक्षा चांगली असली तरी आपण याबाबत असमाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

गंगवार म्हणाले की, “असंघटित क्षेत्रात बेरोजगारी कमी झाल्याची कुठलीच माहिती आपल्याकडे नाही. पंतप्रधान रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. देशात रोजगार कमी झालेला नाही. परंतु बहुतांश लोकांचा ओधा हा कायमस्वरुपी आणि सरकारी नोकर्‍यांकडे जास्त आहे.” संघटित क्षेत्रात दर वर्षी एक कोटी रोजगर निर्मिती होणार आहे. UPSC आणि SSE च्या माध्यमातून दोन लाख 45 हजार लोकांना रोजगार मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button