breaking-newsराष्ट्रिय

स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर बलात्कार

झारखंडमधील प्रकार 
रांची – स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या पाच महिलांवर बंदुकीच्या धाकाने बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार झारखंड राज्यात घडला आहे. मनुष्य तस्करी आणि विस्थापनाच्या संबंधात जनजागृती करण्यासाठी त्या खुंती जिल्ह्यातील चोचांग गावात गेल्या असता त्यांना या भीषण प्रसंगाला तोंड द्यावे लागले आहे.

एका स्वयंसेवी संस्थेचे अकरा जणांचे पथक तेथे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यासाठी तिकडे गेले होते. त्यावेळी बंदुकधारी इसमांचा गट तेथे आला आणि त्यांनी त्यांना धाक दाखवून जवळच्याच जंगलात नेले. आणि त्यांनी या पाच महिलांवर अत्याचार केले. पोलिसांनी वरीष्ठ पातळीवरून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा तातडीने शोध घेतला जात आहे.

यातील आठ आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यांच्यावर बलात्कार झाला आहे त्यामहिलांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती परंतु त्या गावातील काहीं व्यक्तींकडून पोलिसांना हीं माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button