breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रियंका गांधी यांची सोशल मीडियावर बदनामी, महिला पदाधिका-यांची पोलिसांत धाव

  • बदनामी करणा-यांवर कठोर कारवाई करा
  • महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांची मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांची बदनामी करण्याचे कट कारस्थान केले जात आहे. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर शेरेबाजी केली जात आहे. हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान असून तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष गिरीजा कुदळे यांनी केली आहे.

यासंदर्भात कुदळे यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे शामला सोनवणे, इंदु तीवरी, संगीता कळसकर, शोभा मिरजकर, मीना गायकवाड, पूर्व शेख, उषा खवळे, शितल कोतवाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button