TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सूचना

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. दिशा दर्शक बोर्ड लावावेत, कठडे तुटले असेल ते दुरूस्त करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय पार पडली. बैठकीला खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, पोलीस उपअधीक्षक तानाजी चिखले,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील,जिल्हा वाहतूक समन्वयक सुवर्णा पत्की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुषमा गायकवाड, एमएसआरडीएचे कार्यकारी अभियंता चेतन वाणी, एनएचएचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर, महेश देवकाते, भरत शेडगे उपस्थित होते. केंद्र शासनाने सातत्याने अपघात होणारी ठिकाणे, रस्त्याबाबतच्या समस्या याचा आढावा घेण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीचे गठन केले आहे. या समितीची दर सहा महिन्याला बैठक होते. रायगड जिल्ह्यातील या समितीचे अध्यक्ष खासदार बारणे आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. हकनाक लोकांचा बळी जात आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने लेन कटिंग करू नये याबाबत खबरदारी घ्यावी. दंड आकारण्यात यावा. घाटात अधिकचा कर्मचारी वाढवावा. ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या जागेवर तातडीने उपाययोजना कराव्यात. दिशा दर्शक बोर्ड लावावेत. ज्या ठिकाणचे कठडे तुटले असतील, ते दुरूस्त करावेत, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button