breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये कराटे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. ४) पिंपळे सौदागर ज्युदो-कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पृथ्वीराज गार्डनमध्ये घेतलेल्या स्पर्धेला सुमारे ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून शीतो-रियोसीको-काय कराटे-डु आसोसीएशनने स्पर्धेचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमास कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र पोलीस कराटे कोच शिहान कैलास लबडे, पवना सहकारी बॅकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्तात्रय झिंझुर्डे, शिवनाथशेठ काटे,राजू कुटे, अण्णा शेलार, चंद्रकांत कुटे, उद्योजक संजय भिसे, संजय कुटे,राकेश भास्कर,फडनीस, अनय मुळे, संतोष सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागी खेळाडूना नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चषक, मेडल्स व प्रमाणपत्र देण्यात आले. पिंपळे सौदागर – रहाटणी परिसरातील कराटे आसोसीएशनच्या एकुण ७ शाखांपैकी प्लॅनेट मिलेनीयम सोसायटी शाखेला नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फ़ाउंडेशन तर्फ़े चैंम्पीयन्स ट्राॅफी देण्यात आली.
नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या, “ या स्पर्धेस खेळाडूचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुलांनी मैदानी खेळाला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारच्या आउटडोर, मैदानी खेळांचे आयोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button