breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

ATM ने व्यवहार करताय? पण तुम्हाला माहीत आहे का एका दिवसात किती रुपये काढता येतात?

डिजिटल बँकिंगच्या जमान्यात बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. मात्र, अनेक प्रकारच्या गरजांसाठी रोख रकमेची गरज असते. अशा वेळी एटीएममधून पैसे काढावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही एटीएम मशीनमधून एका दिवसात किती पैसे काढू शकता? यासंदर्भात वेगवेगळ्या बँकांचे/कार्डचे नियम वेगवेगळे आहेत.

SBI Bank

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधून ग्राहकांना क्लासिक डेबिट कार्ड किंवा मेस्ट्रो डेबिट कार्डमधून (Withdraw Money from ATM) दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा २०,००० रुपये आहे. तसेच SBI प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्डसह तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपये कॅश काढू शकता. SBI GO लिंक्ड आणि टच टॅप डेबिट कार्ड्सचे लिमिट ४०,००० रुपये आहे.

PNB Bank

PNB या बँकेचे ग्राहक PNB Platinum Debit Card मधून दररोज ५०,००० रुपये काढू शकतात. PNB क्लासिक डेबिट कार्डशी लिंक्ड खात्यातून जास्तीत जास्त २५,००० रुपये काढता येतात.

हेही वाचा – ‘भूजबळांसह चार पाच लोक अजितदादांना व्हिलन बनवत आहेत’; रोहित पवारांचं विधान

HDFC Bank

HDFC या बँकेच्या Millenia Debit Card वर डेली कॅश विथड्रॉल लिमिट ५०,००० रुपये आहे. तर मनीबॅक डेबिट कार्डवर २५,०००  रुपये आणि रिवॉर्ड्स डेबिट कार्डवर ५०,००० रुपये दररोज काढू शकता.

Axis Bank

अ‍ॅक्सिस बँकेत रोख रक्कम काढण्याची मर्यादा दररोज ४०,००० रुपये आहे. यामध्ये सर्व पैसे काढण्यासाठी २१ रुपये फीस आकारली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button