breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात कुटूंबापासून करा – पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील 

पिंपरी (महा ई न्यूज) – स्त्री पुरुष समानतेची सुरुवात प्रथम आपल्या कुटूंबापासूनच करायला हवी. त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय याबाबतीत मुलगा मुलगी असा फरक करु नये. राजकारण, नोकरी – व्यवसाय, सैन्य अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी संर्घषातून यशस्वी वाटचाल केल्याचे दिसते. असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त  स्मार्तना पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने (पीसीसीओईआर) ‘महिला सबलीकरण आणि संरक्षण कायदे’ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात पाटील बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, महिला सबलीकरण केंद्र प्रमुख प्रा. मनिषा देशपांडे, संगणक विभाग प्रमुख प्रा. अर्चना चौगुले, प्रा. सोनाली कणसे, प्रा. राजश्री धारवाडकर, प्रा. अस्मिता सपकाळ, प्रा. वैशाली लाटके, प्रा. रुपाली सोनवणे आदी उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त पाटील म्हणाल्या की, बहुतांश कायदे महिलांच्या संरक्षणासाठी आहेत. शिक्षण व आत्मविश्वास याच्या बळावर महिला सक्षम झाल्या आहेत. महिलांसाठी आरक्षण धोरणामुळे राजकारण, पोलीस, प्रशासन, सैन्य अशा आव्हानांच्या क्षेत्रातही महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. जग बदलण्याची ताकद महिलांमध्ये आहे. सर्व महाविद्यालयात व आस्थापनांमध्ये महिलांच्या हक्कासाठी विशाखा समिती नेमली जावी असे सांगत त्यांनी विशाखा समितीचे महत्व पटवून दिले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रुपाली सोनवणे यांनी तर राजश्री धारवाडकर यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button