breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

प्रियंका गांधींना जीवे मारण्याची धमकी, ट्विटर युजरविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर युजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली. पंकज द्विवेदी नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशच्या बस्ती येथील पोलिसांनी आयपीसी कलम 506 आणि आयटी कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

‘प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्राबाबतचे एक वृत्त ट्विट केले होते. त्या ट्विटवर आरोपी ट्विटर युजरने प्रियंका गांधीविरोधात जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज ट्विट केला होता’, अशी तक्रार द्विवेदी यांनी केली आहे.

दरम्यान, “दोन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केली नाही. पोलिसांनी आरोपीला लवकर अटक करावी अशी”, मागणी उत्तर प्रदेश कॉग्रेसचे (मीडिया विभाग) संयोजक ललन कुमार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button