breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी! चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकरांना रोखले; पोलिसांनी ताफा अडवला

अहमदनगरः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त (ahilyabai holkar jayanti) अहमदनगर येथील चौंडी येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक मोठी घडामोड घडली आहे. चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना पोलिसांनी रोखलं आहे. गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवल्यामुळं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आलं आहे. (NCP VS Gopichand Padalkar)

करोनाचे निर्बंध हटविल्यानंतर प्रथमच आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे उत्साहात साजरी केली जात आहे. तर, गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत हेदेखील अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला आहे. त्यामुळं आक्रमक झालेल्या सदाभाऊ खोत व पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. तर, खोत व पडळकर यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

मी यात्रेवर ठाम आहे. आज आमची यात्रा चौंडीत जाण्यापासून का अडवताय. हे राजकारण कशासाठी करताय. आज त्यांच्या नातवाला लाँच करण्यासाठी अहिल्याबाईंच्या धर्मस्थळाचे राजकारण करु पाहता, याचा मी जाहीर निषेध करतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ‘शरद पवार आणि रोहित पवार या दोघांचही अहिल्याबाईच्या चौंडीमध्ये गलिच्छ राजकारण करतात याचा मी निषेध करतो. मल्हारराव होळकर मुघलांच्या छाताडावर नाचले होते. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरडलं होतं. पवारांना सांगू इच्छितो पोलीस बळाचा वापर करुन तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. महाराष्ट्रातली बहुजनांची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीकाही पडळकर यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button