breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ऑकलंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन; ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेवर परिणाम

ऑकलंड – न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या ऑकलंडमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे ऑकलंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याठिकाणी गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आलं असून याचा फटका न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या टी 20 मालिकेवर झाला आहे. लॉकडाऊनमुळे उभय संघातील चौथ्या आणि पाचव्या सामन्याचे ठिकाण बदण्यात आले आहे. आता हे सामने वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात येणार असून या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेता येणार नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील 2 सामने खेळण्यात आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यांचे आयोजन ऑकलंड आणि माउंट मांगुनईमध्ये करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे ठिकाण बदलण्यात आले आहे.

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला टी 20 सामना 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या मॅचमध्ये किवींनी 53 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. आता ऑस्ट्रेलियाला मालिकेत कमबॅक करायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत तिसरा सामना जिंकला पाहिजे. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना गमावल्यास त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल. उभय संघात मालिकेतील तिसरा सामना 3 मार्चला खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर चौथा सामना 5 तर पाचवा आणि शेवटचा सामना हा 7 मार्चला खेळण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button