breaking-newsराष्ट्रिय

प्रशांत भूषण यांच्या शिक्षेवर उद्या सुप्रीम कोर्ट देणार निर्णय

नवी दिल्ली – न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या शिक्षेवर उद्या गुरुवारी, 20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात निर्णय घेतला जाणार आहे. प्रशांत भूषण यांना कोर्ट कोणती शिक्षा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशांत भूषण यांनी 29 जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरातील राजभवनात दुचाकीवर स्वार झालेल्या छायाचित्रावर टिप्पणी केली होती. तसेच भावी इतिहासकार जेव्हा भारताचा इतिहास लिहितील तेव्हा ते गेल्या सहा वर्षात भारतात कुठलीही आणीबाणी जाहीर झालेली नसताना भारतातील लोकशाही कशी संपुष्टात आली, हे लिहितील. या लोकशाहीच्या विनाशात सुप्रीम कोर्टाच्या भागीदारीवर प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर सरन्यायाधीशांच्या भूमिकेवरही सवाल विचारले जातील, असे ट्विट भूषण यांनी 27 जूनला सुप्रीम कोर्टाविरोधात केले होते. प्रशांत भूषण यांच्या वादग्रस्त ट्विटची दखल घेत सुप्रीम कोर्टाने त्यांना अवमानकारक नोटीस बजावली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. आता उद्या गुरुवारी त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button