breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा

पिंपरी : भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण पारंपरिक पद्धतीने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा झाला. लाडक्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधण्याची लगबग सकाळपासूनच घरोघरी दिसून येत होती. विवाहित बहिणीच्या घरी भाऊ गेले होते, तर बहीणही भावाकडे आल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच पीएमपी बससह खासगी वाहनांनादेखील मोठी गर्दी होती.

बहिणीला काय भेटवस्तू द्यायची याचे भावाकडून नियोजन सुरू होते. शहरातील विविध मिठाईच्या दुकानामध्ये, तसेच बाजारपेठेत खरेदीची लगबग दिसून आली. शहरात सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. काही संघटनांनी वृक्षाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. काही महिला संघटनांच्या पुढाकाराने देशाच्या सीमेवर रक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. शहरातील विविध पोलीस ठाण्यातही रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रविवार सुटीचा दिवस असतानाही पोस्टमन काकांची राख्या वेळेवर पोहोचविण्यासाठी लगबग सुरू होती. सोशल मीडियावरही रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर बहिणीने ओवाळल्याचे, तसेच राखी बांधल्याचे फोटो पाहायला मिळाले. यासह भावा-बहिणीविषयी प्रेम व्यक्त करणा-या गाण्यांचा सोशल मीडियावर मोठा वर्षाव झाला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button