breaking-newsमुंबई

शिवाजी पार्क आणि शिवाजी मंदिर यांचीही नावं बदलणार!

मुंबईतील दादर भागात असणारे शिवाजी पार्क मैदान आणि शिवाजी मंदिर नाट्यगृह या दोन्हींची नावं आता बदलणार आहेत. या दोन्ही नावांपुढे छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख आता असणार आहे. मुंबईचे महापौर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही या संदर्भातली माहिती दिली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्यात आली. ते नाव आधी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते. जे आता बदल केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्याचे नाव असणार आहे. महाराज हा शब्द आधीच्या नावात नव्हता त्याची भर या नावात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी मंदिर आणि शिवाजी पार्क यांच्याही नावात बदल करण्यात येणार आहे अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button