breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

स्वत:हून संबंध ठेवल्यानंतर मुलीच बलात्काराची तक्रार करतात, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोठ वक्तव्य

छत्तीसगढ |

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धक्कादायक विधान केलेले आहे. ‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात’, असं संतापजनक वक्तव्य अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. किरणमयी नायक या छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.

त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. जेव्हा एक विवाहित व्यक्ती एखाद्या तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी ती व्यक्ती आपल्याला जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा या व्यक्तीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यानंतर नाते हे दुरावतात तेव्हा तरुणीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी धाव घेते, असंही किरणमयी नायक म्हणालेल्या आहेत.

एवढंच नाहीतर किरणमयी नायक यांनी मुलींना  सल्लाही दिला आहे. ‘अल्पवयीन मुलींनी कोणत्याही सिनेमातील फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नये, त्यामुळे तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होऊन जाईल. हल्ली वयाच्या 18 व्या वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. लवकर लग्न झाल्यानंतर लवकर मुलंही होतात. त्यामुळे त्यांना एकत्र राहण्यास अडचण येते’ असंही त्या म्हणाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button