breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘प्रधानमंत्री आवास’चे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लगत आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेत महापालिका प्रशासनाने अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना पिंपरी चिंचवड शहर समिती यांच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा केंद्राची कमतरता आहे. वैयक्तिक लॅपटॉप सर्वसामान्य लोकांकडे नाहीत. मोबाईलवर अर्ज भरणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button