breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना सहकारी बँकेच्या संचालिका, माजी नगरसेविका शकुंतला साठे यांचे निधन

पिंपरी । प्रतिनिधी

पवना सहकारी बँकेच्या संचालिका आणि माजी नगरसेविका शकुंतला साठे यांचे आज दि. 27) अल्प आजाराने निधन झाले.
शकुंतला साठे 1992 ते 1997 या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेविका होत्या. पिंपरी भागातून त्या निवडून आल्या होत्या. त्या पवना सहकारी बँकेच्या संचालिका देखील होत्या.
पिंपरी भाजी मंडईमध्ये त्यांचा भाजी विक्रीचा गाळा आहे. भाजी विक्रेता ते नगरसेविका असा त्यांचा प्रवास होता. पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या (पीसीएमटी) चेअरमन पदावर देखील त्यांनी काही काळ काम केले होते. मागील काही दिवसांपूर्वी त्या आजारी पडल्या. त्यातच त्यांचे निधन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button