मनोरंजन

प्रदर्शनापूर्वीच “रेस-3’चा रेकॉर्ड

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याचा “रेस-3′ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सूकता वाढविली असून तो खूप चर्चेत आहे. “रेस-3′ चित्रपटाने प्रदर्शीत होण्यापूर्वीच बॉलीवूडमध्ये एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. सलमान खानचा हा चित्रपट बॉलीवूडमधील पहिला चित्रपट ठरला आहे ज्याला सेटेलाइट राईटस्‌साठी सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

“रेस-3’ला सेटेलाइट राईसट्‌ तब्बल 130 कोटी रुपयांना देण्यात आले आहेत. ही रक्कम आतापर्यंत बॉलीवूड चित्रपटाला देण्यात आलेली सर्वाधिक किंमत आहे. या राईटस्‌साठी एका नामांकित नेटवर्क कंपनीने सलमान सोबत हातमिळवणी केली आहे. या करारामुळे चित्रपटाने निर्मितीसाठी केलेला खर्च प्रदर्शनापूर्वीच वसूल केला आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 130 कोटींचा खर्च आला होता.

“रेस-3′ चित्रपट ईदनिमित्त 15 जून रोजी प्रदर्शीत करण्यात येणार आहे. या ऍक्‍शन चित्रपटात सलमान खानशिवाय अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह आणि बॉबी देओल आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहे. “रेस’ फ्रेंचाइजीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा याने केले आहे.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button