मनोरंजन

“प्रभूदेवा इन खाकी’

प्रसिध्द कोरिओग्राफर प्रभूदेवा यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरू केले आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव निश्‍चित झालेले नसले तरी यात तो खावी वर्दीीत म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल हे स्पष्ट झाले आहे.
आता पोलीसाच्या वर्दीत प्रभूदेवाला त्याचे चाहते पाहणार आहेत. याबद्दल प्रभुदेवाने ट्‌विटरवर माहिती दिली आहे. चित्रपटामधील काही स्टारकास्टचे फोटो शेयर करत त्याने “प्रभुदेवा इन खाकी’ असेही लिहिले आहे. प्रभूदेवाच्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. सी. मुगील करीत आहेत. तसेच प्रभुदेवा तमिळ चित्रपट “चार्ली चॅपलिन 2’मध्ये अदा शर्माची भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय “यंग मंग संग’, ” गुलेभकावली’ आणि “खामोशी’ चित्रपट प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहेत.

दरम्यान, सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजी “दबंग’च्या तिसरा भाग असलेल्या “दबंग-3′ चित्रपटाचे निर्मिती प्रभुदेवा करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण 14 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीचे दोन्ही चित्रपटाची निर्मिती अरबाज खान याने केली होती. मात्र, “दबंग-3’निर्मिती प्रभुदेवा करणार आहे. ज्याने सलमान खानचा 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या “वॉटेड’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर सलमान खानच्या करिअरने बॉलीवूडमध्ये पुन्हा दमदार एन्ट्री केली होती.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button