breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री पल्लवी जोशीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हा मराठमोळ्या पल्लवी जोशीचा नवरा. पल्लवी जोशी हे नाव अंताक्षरी कार्यक्रमाच्या दुनियेतलं प्रसिद्ध नाव. केवळ मराठी नाही तर हिंदी मालिका,सिनेक्षेत्रात गाजलेलं नाव. तर विवेक अग्निहोत्री यानंही दिग्दर्शक म्हणून चांगलं नाव कमावलंय. पण अचानक विवेकला त्याच्या आगामी ‘द काश्मिर फाइल्स’ सिनेमामुळे धमक्या मिळू लागल्या आहेत. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारलं जाईल अशा धमक्या त्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याने आपलं ट्वीटर अकाऊंट बंद केल्याचं सांगितलं आहे. काय झालंय नेमकं जाणून घ्या सविस्तर.

पल्लवी जोशीचा नवरा विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ती धमकी मिळाल्यानंतर त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की, या धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी आपलं ट्वीटर अकाऊंट काही काळापुरतं बंद केलं. बोललं जात आहे की त्यांच्या आगामी बहुचर्चित ‘द काश्मिर फाइल्स’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यासाठी ही धमकी दिली गेली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे,”खूप लोकांना वाटलं असेल की माझ्यावर ट्वीटरनं बंदी आणली आहे. की मला ट्वीटरनं अकाऊंट बंद करण्याची सक्ती केली आहे. पण असं काही नाही.मी स्वतःहून ते अकाऊंट बंद केलं आहे. त्याचं झालं असं की मी जेव्हापासून ‘द काश्मिर फाइल्स’ सिनेमा निमित्तानं अभियान सुरू केलं तेव्हापासून ट्वीटरवरील आंदोलकांनी माझ्यावर प्रतिबंध लावण्यास सुरुवात केली. माझ्या फॉलॉअर्सची संख्याही कमी होऊ लागली. आता माझे बरेच फॉलोअर्स माझं ट्वीट नाही पाहू शकत आहेत. त्याचबरोबर मला खूप घाणेरडे,अश्लील आणि धमक्या देणारे मेसेजेस येऊ लागले..तुम्हाला कदाचित कोण असेल त्याचा अंदाज येईल बहुधा”

विवेक अग्निहोत्रीनं पुढे लिहिलंय,”असं नाही की मी या परिस्थितीला हाताळू नाही शकत. पण मला वाटत होतं त्या धमक्यांमागे पाकिस्तानी आणि चायनामधील कुणाचातरी हात नक्कीच आहे. तुम्ही कितीही सक्षम,खंबीर असा पण जेव्हा तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेततं तेव्हा मात्र तुम्ही कमजोर पडता. तिथे आपला तोल ढासळतो. का करतंय कुणी हे? मी खरंतर या सिनेमातून एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपल्या काश्मिरी भावा-बहिणींसाठी,त्यांच्या हक्कासाठी मी सिनेमा बनवला यात काय चुकलं? ते खरं जगासमोर येईल म्हणून घाबरत आहेत का? सोशल मीडियाच्या या वाईट दुनियेनं त्यांना ही ताकद दिली आहे,लोकांना घाबरवण्याची. आणि आपण घाबरलो तर ते अधिक निडर बनत जातात. ‘द काश्मिर फाइल्स’ आता त्याविरोधात आवाज उठवणार आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button