breaking-newsमनोरंजन

वेल प्लेड सिक्सर

ठळक मुद्देबायोपिकमध्ये त्या व्यक्तिची कारकिर्द नाही तर त्याचा खरा स्वभाव, त्याचे दोष हेही जगापुढे आणणे गरजेचे असते. असेच बायोपिक  आदर्श बायोपिक म्हणतात येईल. या कसोटीवर हा चित्रपट सुनील दत्तच्या संवादाप्रमाणेच ‘वेल प्लेड सिक्सर’ आहे.

 

‘संजू’ हा रणबीर कपूरचा चित्रपट बघायला लोक आतूर आहेत. चित्रपटगृहांतील गर्दी बघितली की, याचा अंदाज येतो. अभिनेता संजय दत्त हा आपल्या करिअरच्या सुरूवातीपासूनच controversy’s child’ म्हणूनच ओळखला जातो. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्त व एकेकाळची गाजलेली अभिनेत्री नरगिस यांचा एकुलता एक मुलगा म्हणून ‘संजूबाबा’ कायम मीडियाच्या केंद्रस्थानी राहिला. पुढे ड्रग्ज आणि मद्याचे व्यसन, दहशतवादी असल्याचा आरोप, तुरुंगवास अशा अनेक गोष्टींमुळे गत ३५ वर्षांत या अभिनेत्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकू आल्यात. लोकांनी त्याच्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले. याकाळात कधी लोकांनी त्याला दहशतवादी ठरवलं तर कधी सुपरस्टार म्हणून डोक्यावर नाचवलं. याच संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक म्हणजे ‘संजू’.  खरे तर बॉलिवूडमध्ये बायोपिक कायम विषयाची बाजू घेऊनचं तयार होतात. ज्या व्यक्तिवर बायोपिक बेतलेले आहे, तिच्या नकारात्मक बाजू, तिने घेतलेले चुकीचे निर्णय याचा कधीच उहापोह केला जात नाही. त्यामुळेच ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘अजहर’, ‘हसीना’ यासारखे बायोपिक फारच एकतर्फी आणि  फिके वाटलेत. ‘संजू’बद्दलही नेमक्या याच भावना घेऊन कुठलाही प्रेक्षक चित्रपटगृहाची पायरी चढतो. कदाचित संजयच्या पीआरसाठी, त्याला वाल्याचा वाल्मिकी बनवण्यासाठी  चित्रपटाचा घाट घातला नसावा ना, अशी शंका येते. पण ‘संजू’ पडद्यावर सुरू होतो आणि पहिल्या २० मिनिटांतचं या सगळ्या शंका गळून पडतात.  ‘संजू’ हा चित्रपट संजय दत्तच्या आयुष्याकडे अगदी तटस्थपणे पाहणारा चित्रपट आहे, याची खात्री पटते. असे म्हणतात की, वास्तव हे कल्पनेपेक्षाही अनोळखी असते. संजयच्या आयुष्यात काय काय भन्नाट गोष्टी होता, नशेच्या, अहंकाराच्या, भीतीच्या आहारी जावून माणूस काय काय करू शकतो आणि किती चुकीचे निर्णय घेऊ शकतो, हे सगळेच कल्पनेपलीकडचे आहे.

वर्तमानपत्रातून रोज होत असलेल्या चुकीच्या आरोपांना, दहशतवादी म्हणून हिणवणा-या लोकांना उत्तर द्यायला संजू (रणबीर कपूर)एका लेखकाच्या शोधात असतो. आयुष्यात केलेल्या चुकांची जाहिर कबुली देण्यासोबतचं, न केलेल्या चुकांचे स्पष्टीकरणही त्याला या माध्यमातून द्यायचे असते. याचदरम्यान संजू आणि त्याची पत्नी मान्यता (दिया मिर्झा) विदेशी आत्मचरित्रकार विनी डायस (अनुष्का शर्मा) हिला भेटतात आणि तिला संजूची आत्मकथा लिहिण्याची विनंती करतात. पण विने स्वत:ही संजयजा एक अतिरेकी आणि एक अय्याश अभिनेता समजत असते. ती लिहिण्यास नकार देते. पण संजू व मान्यताशी केलेल्या अनौपचारिक चर्चेत ती सुद्धा संजयच्या आयुष्यात गुरफटत जाते आणि संजूची कथा सुरु होते. ‘रॉकी’ चित्रपटाच्या शूटवेळी वडिलांची तत्त्वे, त्यांची शिस्त आणि त्यामुळे आलेला ताण, एका मुलीसोबतचे अफेअर, वाईट संगतीमुळे लागलेले ड्रग्जचे व्यसन इथून ही कथा सुरू होते. आईचा (मनीषा कोईराला)आजार, तिचा अकाली मृत्यू, नवे नवे करिअर आणि यादरम्यानचा डोक्यात उडालेला गोंधळ यामुळे संजू ड्रग्जच्या  आहारी जातो. आई मृत्यूशय्येवर असतानाही तो नशेत तर्र असतो. नशेतच्या गर्तेत अडकलेला संजू वडिल (परेश रावल), आपला एक अमेरिकन मित्र यांच्या मदतीने यातून कसा बाहेर पडतो, यानंतर आपल्या करिअरमध्ये कसा यश मिळवतो आणि मग काही चुकीच्या निर्णयानंतरच्या परिणामांना कसा सामोरा जातो, ही या चित्रपटाची कथा आहे.
बायोपिकमध्ये त्या व्यक्तिची कारकिर्द नाही तर त्याचा खरा स्वभाव, त्याचे दोष हेही जगापुढे आणणे गरजेचे असते. असेच बायोपिक  आदर्श बायोपिक म्हणतात येईल. या कसोटीवर हा चित्रपट सुनील दत्तच्या संवादाप्रमाणेच ‘वेल प्लेड सिक्सर’ आहे. संजय दत्तच्या अंर्तमनातील द्वंद्व दिग्दर्शक लेखक राजकुमार हिरानी आणि सहलेखक अभिजात जोशी यांनी अगदी तरलपणे पडद्यावर रेखाटले आहे. त्याच्या स्वभावाचे अनेक कंगोरे अगदी त्याचा उद्दामपणा, खट्याळपणा, वडिलांबद्दलचा त्याच्यामनातील दरारा, त्यांच्याबद्दलचा  अभिमान, जिंकण्याचा हट्ट, त्याच्या मनातील संशय, भीती हे सगळे उत्तमपणे पडद्यावर जिंवंत केले आहे. संजयचे ड्रग्जचे व्यसन आणि टाडा केसवर चित्रपट घुटमळतो. ३५० गर्लफ्रेन्ड्स असूनही त्याची पे्रमप्रकरणे किंवा फिल्मी करिअर यावर हा चित्रपट फारसा बोलत नाही.
मुख्यत: संजूचे आपल्या वडिलांसोबतचे आणि अमेरिकन मित्राबरोबरच्या नात्याद्वारे ही कथा सांगितली गेली आहे. रणबीर कपूरशिवाय इतर कुठलाही अभिनेता संजयच्या भूमिकेला न्याय देऊ शकला नसता, यात वादचं नाही. प्रत्येक टप्प्यातील संजय अगदी तो हुबेहूब उभा करतो. परेश रावल यांनीही सुनील दत्त यांची व्यक्तिरेखा अगदी प्राणपणाने साकारली आहे. त्यांची रणबीरसोबतची केमिस्ट्री उत्कृष्ट आहे. विकी कौशलनेही अमेरिकन मित्राच्या भूमिकेत जीव ओतला आहे.

अन्य कलाकारांच्या वाट्याला फार काम नाही. तरिही सोनम कपूर आणि नरगिसच्या भूमिकेतील मनीषा कोईराला एकदम जमून आल्या आहेत.   हा चित्रपट म्हणजे संजय दत्तचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे का? असा तुमचा प्रश्न असेल तर आम्ही एकच म्हणू की, हा चित्रपट उदात्तीकरणही करत नाही आणि प्रतिमेचे खच्चीकरणही करत नाही़, हा प्रयत्न आहे तो केवळ माणूस समजण्याचा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button