breaking-newsमनोरंजन

हृतिक-टायगरचा बॉक्स ऑफिसवर जलवा

जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून डान्स याचे उत्तम समीकरण असलेला अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता टायगर श्रॉफचा ‘वॉर’ हा चित्रपट २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांनी मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर केली. विशेष म्हणजे या चित्रपटातून या दोघांमध्ये झालेले ‘वॉर’ प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनींग मिळाली आहे.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई ट्विटरद्वारे सांगितली आहे. ‘वॉर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल ५३.३५ कोटी रुपयांची कमाई करत ‘भारत’, ‘मिशन मंगल’, ‘साहो’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांना मागे टाकले आहे. याआधी आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाला सर्वात मोठी ओपनिंग मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५०.७५ कोटींची कमाई केली होती. आता ‘वॉर’ चित्रपटाने हा विक्रम मोडला आहे.

सिद्धार्थ आनंदने ‘वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अॅक्शनसीनचा भरणा करण्यात आला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स यामध्ये पाहायला मिळत आहेत. चित्रपटाची कथा स्पेशल एजंट कबीर ( ऋतिक रोशन) आणि खालिद( टायगर श्रॉफ) या दोन कलाकरांभोवती फिरताना दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button