breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा बजावला समन्स

मुंबई -टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अडकलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. सोमवारी (१४ डिसेंबर) प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी हजेरी राहण्याचे आदेश दिले आहेत. आधी दोन दिवसांपूर्वीही प्रताप सरनाईकांची ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

वाचा :-शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सापडले पाकिस्तानी क्रेडीट कार्ड

मिळालेल्या माहितीनुसार, टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स बजावला आहे. यात ईडीने प्रताप सरनाईक यांना येत्या सोमवारी (14 डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहा, असे आदेश दिले आहेत. पण विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावलेला नाही.दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते ईडीच्या कार्यालयात गुरूवारी ( १० डिसेंबर) सकाळी ११ वाजता हजर झाले. यावेळी त्यांची सतत सहा तास चौकशी चालली. ही चौकशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button