breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडूत सिनेमा गृह शंभर टक्के भरण्याची परवानगी

चेन्नई – तामिळनाडूतील चित्रपट गृह शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. पोंगल सण आणि मास्टर व ईश्वरन या चित्रपटांचे प्रदर्शन यांच्या पार्श्वभूमीवर सिनेमा गृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विजय आणि सिबू यांच्यासह काही कलाकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार सरकारने ही परवानगी दिली आहे.

वाचा :-नव्या संसद भवनाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाकडून मंजुरी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी यांची गेल्या आठवड्यात विजयने भेट घेतली होती. त्यावेळी त्याने सिनेमा गृहांना असलेली ५० टक्केची प्रेक्षक मर्यादा १०० टक्केपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी केली होती. विजयचा मास्टर हा सिनेमा १३ जानेवारीला तमिळ, हिंदी, तेलगू आणि कन्नड या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. असे असताना ही परवानगी मिळाली आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांना प्रवेश देताना त्यांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल आणि कोरोनाच्या इतर नियमांचेही पालन करावे लागेल, असे सरकारने ही परवानगी देताना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button