breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणशरद पवार @80 वाढदिवस स्पेशल

शरद पवारांसोबतचा ‘तो’ किस्सा; ज्यामुळे हसन मुश्रीफ भावूक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. पण पवारांसोबतचा 2009 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरचा किस्सा सांगताना मुश्रीफांना गहिवरून आले तसेच त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.

2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेशोत्सवादरम्यान जातीय दंगल झाली. त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मात्र याही परिस्थितीत मुश्रीफ कागलमधून विक्रमी मतांनी निवडून आले होते.

वाचाः ‘I am Possible’; शरद पवारंबद्दल अमृता फडणवीस काय म्हणाल्या वाचा

या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझा कार्यकर्ता निवडून आला याचा मनस्वी आनंद असल्याचा उल्लेख केला होता. या उल्लेखा विषयाचा अनुभव सांगताना मंत्री मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button