breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रवादीचे बांदल, मोहिते गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं, त्यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही – माजी खासदार आढळराव पाटील

शिरुर – पुणे जिल्ह्यातील खेळचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. बांदल हे लोकांना जमिनीच्या व्यवहारात लोकांना फसवितात, आणि मोहिते जर राजकारण नसते, तर एक अट्टल गुन्हेगार म्हणून उदयास आले असते. अशी टिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

राष्ट्रवादीचे एक खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण दंगलीचे आरोप आहेत तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, दोघेही शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या यांच्या सांगण्यावरून पोलीस हे करत आहेत, असा आरोप करत आहेत. याविषयी आज (रविवारी) शिवाजी आढळराव पाटील यांनी या दोन्ही नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

आढळराव म्हणाले की, या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. मंगलदास बांदल हा जमिनीच्या व्यवहारात लोकांना ठगतो, लोकांना फसवणे, खंडणी मागणे, कंपनी मालकांना त्रास देणे, डान्स बार चालवणे किंवा लोकांना धमकावणे अशा प्रकारची त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. 300 ते 400 कुटुंबाची जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आली आहे. बांदलची गुन्हेगार पार्श्वभूमी असताना तो माझे नाव का घेतो? असा सवालही आढळराव यांनी यावेळी उपस्थित केला.

दिलीप मोहिते जर राजकारणात आला नसता तर एक अट्टल गुन्हेगार दंगलखोर अशा स्वरूपाचा माणूस म्हणून उदयास आला असता, असे सांगत मोहितेची चाकण दंगल प्रकरणात विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. चाकण शहराचे वातावरण बिघडवणे आणि मराठी मोर्चाला बदनाम करायचे काम त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी चालू आहे, असे असताना 15 वर्षांत अशा स्वरूपाचे कोणतेही आरोप मी त्यांच्यावर केले नाहीत. पोलिसांनी पकडले की, आढळरावने हे केले, असे ते म्हणतात, हे कुठं तरी थांबवा, असे आवाहन आढळराव यांनी यावेळी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button