breaking-newsआंतरराष्टीय

पॅरिस करारातून अमेरिकेची माघार

पॅरिस हवामान करारातून अमेरिका माघार घेत असल्याची अधिकृत सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना दिली आहे. या करारातून माघार घेत असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले असले तरी त्यावर अखेर सोमवारी  शिक्कामोर्तब करण्यात आले.

या करारातून माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी जून २०१७ मध्येत केली होती पण त्याची प्रक्रिया सोमवारी संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना देऊ न सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमेरिका नोव्हेंबर २०२० मध्ये या करारातून मुक्त होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले की, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली आहे. या करारातील अटीनुसार अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना या करारातून बाहेर पडत असल्याची सूचना पाठवली आहे. त्यानंतर एक वर्षांने अमेरिका या करारातून संपूर्णपणे बाहेर पडेल. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांना करारातून माघार घेत असल्याबाबत पहिली सूचना ४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिली होती. पॅरिस करार १२ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. त्यावर अमेरिकेने २२ एप्रिल २०१६ रोजी स्वाक्षरी केली होती व ३ सप्टेंबर २०१६ रोजी कराराचे पालन करण्यास अनुमति दिली होती. करारातून माघार घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. फ्रोन्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान यांनी यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आहे.

चीनकडून नाराजी व्यक्त

अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना अधिसूचित केल्याबाबत चीनने नाराजी व्यक्त केली आहे.

बराक ओबामा यांच्या काळात हा करार झाला होता. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर या करारातून माघार घेण्याची घोषणा केली होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, अमेरिका हवामानाच्या मुद्दय़ावर जास्त जबाबदारी घेऊन काम करील अशी आशा आहे. हवामान बदल हे मानवतेसमोरचे मोठे आव्हान असून त्यावर उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने नकारात्मकता आणणे चुकीचे आहे.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात बुधवारी बीजिंग येथे संयुक्त हवामान जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button