breaking-newsमुंबई

साठ्ये महाविद्यालयात ‘कलोत्सव’ च्या माध्यमातून रंगणार खास सोहळा

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात बीएमएम विभागातर्फे कायम नवनवीन संकल्पना घेऊन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माध्यम महोत्सवाचे हा त्यापैकीच एक महत्त्वाचा महोत्सव. यंदा दिनांक १७, १८ आणि १९ डिसेंबर २०१८ रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यंदाचा  माध्यम महोत्सव हा कलाकारांसाठी आणि कलेच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणारा असणार आहे. ‘कलोत्सव’ “A continent of Art ” या टॅगलाईन अंतर्गत यामधील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन  लेखिका, बालसाहित्यिका आणि मराठी विश्वकोश  मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू आणि माध्यमतज्ञ डॉ.विजय धारूरकर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवानिमित्त दरवर्षी अनेक मान्यवर दिग्गज साठये महाविद्यालयास भेट देतात.तसेच, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाचे वर्षही गाजेल अशी आशा आहे.

विविध घटकांतर्गत येणाऱ्या  व्यापक अशा ६४ कलांचा यात समावेश असणार आहे. कलांबाबत तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यामध्ये तब्बल ३२ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी त्यात सहभाग घेणार आहेत. गेल्या सहा  वर्षापासून बीएमएम विभागातर्फे माध्यम महोत्सवात ‘चित्रशताब्दी’, ‘माध्यमांची जत्रा’, ‘बायोस्कोप’, ‘माध्यमगड’  ‘पुस्तकोत्सव’ , ‘डिजीवर्ल्ड’  अशा नवनवीन संकल्पना यशस्वीरित्या आयोजित करण्यात आल्या आणि त्या गाजल्याही. कलोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे पथनाट्य, flashmob हाही आकर्षणाचा भाग असतो. या माध्यम महोत्सवात चर्चासत्रे तसेच अनेकविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचाही आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि मास मीडिया विभागातील सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून ‘माध्यम महोत्सव : कलोत्सवाला’ भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बीएमएम विभागप्रमुख गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button